व्हीएसआरएस मराठी न्युज -कै लक्ष्मण जगताप ह्यांच्या घरी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज भेट घेऊन कै दिगंबर भेगडे ह्यांच्या निवासस्थानी तळेगाव दाभाडे ह्या ठिकाणी जाताना निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर ह्यांना भेटण्यासाठी रावसाहेब दानवे पाटील मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी रस्त्यावर गाड्यांचा ताफा थांबवून सचिन काळभोर ह्याची भेट घेतली .
त्या वेळी रेड झोन एरिया कमी करण्यासाठी सचिन काळभोर ह्यांनी रावसाहेब दानवे पाटील ह्यांच्या कडे मागणी केली .त्या संदर्भात संरक्षण मंत्री ह्यांच्या बरोबर बोलणं करून त्या संदर्भात बैठक घेण्याची ग्वाही खुद्द रावसाहेब दानवे पाटील यांनी सचिन काळभोर ह्यांना सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन क्षेत्र कमी झाले तर बांधकाम परवाना मिळेल तसेच बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई थंड होईल अशी अपेक्षा सचिन काळभोर ह्यांनी वक्त केली रेड झोन क्षेत्र २००० यार्ड वरुन ५०० मीटर करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली.
रावेत किवळे चिखली मोशी तळवडे निगडी बोपखेल दिघी ह्या गावांना रेड झोन क्षेत्र कमी झाल्याने दिलासा मिळेल.
पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी नावाने रेड झोन क्षेत्र नकाशा जाहीर केला असून त्याचा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे जाचक अटी शर्ती नियमानुसार धोरण राबवून नव्याने नकाशा जाहीर करण्यात आला आहे.
Discussion about this post