व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्ग या मार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे यासाठी आदरणीय राज साहेबांची भेट घेण्यात आली
निगडी ते पिंपरी विस्तारित मार्ग 4.41 किलोमीटर आहे , यामध्ये तीन मेट्रो स्टेशन आहेत , चिंचवड, आकुर्डी व निगडी, राज्य शासनाच्या मंजुरीनंतर हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे राज्य शासन 170 कोटीचा भार उचलण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे केंद्र शासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका उर्वरित भार उचलणार आहे
पिंपरी ते निगडी विस्तारित मार्ग यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला , तर नंतर स्थायी समितीने सुद्धा यासाठी मंजुरी देण्यात आली होती, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , यांनी 27 फेब्रुवारी 2019 ला हिरवा कंदील दाखवला होता
आताही मंजुरी अंतिम टप्प्यात असून केंद्र ने लवकरात लवकर मंजुरी द्यावी व निगडी ते पिंपरी काम लवकर चालू व्हावे यासाठी आदरणीय राज साहेबांची भेट घेण्यात आली
आज मुंबई शिवतीर्थ या निवासस्थानी आदरणीय राज साहेबांची भेट घेण्यात आली , यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील शहर मनसे व पिंपरी चिंचवड सिटीजन फोरम, राजीव जी भावसार , तुषार जी शिंदे , सूर्यकांत मुथियान, उपस्थित होते
आदरणीय राज साहेबांनी सर्वांना सांगितले या प्रकरणात मी लक्ष देऊन हे काम मार्गी लावू
सचिन चिखले – मनसे शहरअध्यक्ष
Discussion about this post