Pimpri News : पिंपरी : खेळाडूचा स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी घेतलेले कठोर परिश्रम खेळाडूला यशाच्या जवळ घेऊन जातात, असे मत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने व्यक्त केले.
चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनला स्कूलमध्ये आयोजित स्पोर्ट फेस्टिवलच्या बक्षीस वितरण समारंभास हरभजन सिंग याने प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली, त्यावेळी तो बोलत होता.
हरभजन म्हणाला, मुलांनी स्वतः ठरवावे की त्यांना खेळाडू व्हायचे आहे की नाही. कारण मनात नसेल तर एक वेळा अभ्यास करता येतो. पण इच्छाशक्ती असल्याशिवाय खेळाडू बनणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या आवडीचा खेळ खेळा. जो खेळ निवडाल त्या खेळात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करा. इतरांपेक्षा अधिक मेहनत करा, यश नक्की प्राप्त होईल.
Discussion about this post