पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | दहावी बोर्ड परीक्षार्थींची आता प्रतीक्षा संपली असून परीक्षेची धावपळ सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 6 फेब्रुवारीपासून परीक्षेचे हॉल तिकीट दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हे हॉल तिकीट मुलांना प्रिंट करून घेयचे आहेत.
विद्यार्थ्यांची दहावीची परिक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. 6 फेब्रुवारी पासून हॉल तिकीट आल्याने त्यात जर काही सुधारणा असतील तर विद्यार्थ्यांनी दुरुस्त करून घेयच्या आहेत. जेणेकरून त्यांना परीक्षेवेळी अडथळा निर्माण होणार नाही. त्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांकडे असणार आहे.
Discussion about this post