व्हीएसआरएस मराठी न्युज –सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या सनसिटी भागात गोळीबार झाल्याचे खळबळजनक घटना घडली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर गोळीबार करण्यात आला आहे.
रमेश बद्रीनाथ राठोड यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून यात ते जखमी झाले आहे. नेमका हा गोळीबार कुणी केला. याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या सनसिटी भागात गोळीबाराची घटना घडली आहे. मंगळवारी दिवसाढवळ्या ही गोळीबाराची घटना घडली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गोळीबाराची घटना घडली आहे.
गोळीबार रमेश बद्रीनाथ राठोड नावाच्या व्यक्तीवर करण्यात आला आहे. गोळीबारात रमेश बद्रीनाथ राठोड जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला बंदुकीच्या दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळीबारात जखमी झाल्यानंतर रमेश राठोड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात २४ तासात गोळीबाराची दुसरी घटना घडली आहे.
Discussion about this post