व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-निवडणूक, लोकशाही, मताधिकाराचे आणि मतदार नोंदणीचे महत्त्व आदी विषयांवर जनजागृतीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयालयाच्यावतीने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयावर घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यावतीने देण्यात आली.
या स्पर्धेमध्ये अभिनव कल्पना राबवत मताधिकाराचे आणि मतदार नोंदणीचे महत्त्व, मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणे हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करता येईल.
मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर सजावटीतून जागृती करता येऊ शकते. स्पर्धेची नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in आणि समाजमाध्यमांवर देण्यात आलेली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून गणेश मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतच https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरून देखावा, सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे.
Discussion about this post