Pune News : पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातील कुख्यात गुंड जुनेद शेख व त्याच्या चार साथीदारांवर पोलिसांनी मोका कायद्याखाली कारवाई केली आहे.
जुनेद एजाज शेख, वय-२३ वर्षे, अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे, वय २१ वर्षे,मंगेश ऊर्फ घुल्या दिपक काळोखे, वय १९ वर्षे, निखील ऊर्फ बॉडी जगन्नाथ शिंदे, वय २३ वर्षे, आणि एक अन्य साथीदार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
दि. २६ डिसेंबर रोजी आरोपींनी लक्ष्मीनगर, येरवडा परिसरात २७ वाहनांच्या काचा फोडून, नागरिकांना शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी जुनेद शेख, अविनाश शिंदे, मंगेश काळोखे यांना पोलीसांनी अटक केली आहे. तर उर्वरित दोघे फरार आहेत.
आरोपी सराईत गुन्हेगार असून ते संघटित गुन्हेगारी करत असल्याने येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर, शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा यांच्याकडे या टोळीवर मोकाखाली कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
Discussion about this post