Pune News : पुणे : महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा २९ एप्रिल रोजी पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावर होणार असल्याचे वृत्त आहे.
पुणे येथे युतीचे मुरलीधर मोहोळ, आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे या तुल्यबळ उमेदवारात लढत होत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची सभा मोहोळ यांचा विजय सुकर करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
मात्र, रविंद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल आणि प्रियांका गांधी, आदित्य ठाकरे यांच्याश आघाडीचे अन्य नेतेही सभा घेणार असल्याचे समजते.
Discussion about this post