Pune News : पुणे : पुणे शहर पोलीसदलातील एक उपनिरीक्षक आणि एक वकील यांच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण (वय ३५, नेमणूक – अलंकार पोलीस स्टेशन ,पुणे शहर), वकील राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१, रा. कोथरुड ,पुणे) अशी या दोघांची नावे आहेत.यातील वकीलाला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना २२ जानेवारी रोजी पकडण्यात आले.
एका व्यक्तीच्या भाविरोधात अलंकार पोलीसठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. उपनिरीक्षक गणेश चव्हाण याने त्याला अटक न करता गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी पडताळणी केली असता तक्रारीत तत्थ्य आढळले. अधिकार्यांनी सापळा रचला. त्यावेळी उपनिरीक्षक चव्हाण याच्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुल फुलसुंदर हा वकील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.
याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post