Pune News : पुणे : दृष्यमानता कमी झाल्यामुळे देशातील अनेक विमानतळांवरील विमान वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून दिल्लीमध्ये गडद धुके आहे. परिणामी मुंबई, पुणे, पटणा, अहमदाबाद, जयपूर आदी शहरांकडे जाणारी अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.काही विमाने उशिरा उड्डाण करणार आहेत.
हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून विमानतळ असलेली अनेक शहरे धुक्याच्या चादरीखाली झाकली गेली असल्याने हवाईवाहतूक प्रभावित झाली आहे.
पुण्यामध्येही पहाटेच्यावेळेत मोठ्या प्रमाणात धुके दिसून येत आहे.
Discussion about this post