Pune News : पुणे : पुणे लष्कर परिसरात फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या मोटारसायकल चालकाकडून चिरीमिरी घेऊन त्याला सोडून देणार्या वाहतूक पोलिसाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्य पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.
विजय मेवालाल कनोजिया असे त्याचे नाव आहे. ३० मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास महावीर चौकात ड्यूटी करत असलेल्या कनोजिया यांनी फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या एका मोटारसायकल चालकास अडविले. त्याच्याकडून पैसे घेतले, आणि त्याला दंड न करता सोडून दिले. हा प्रकार त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला. त्याची क्लिप कोणीतरी सोशल मीडियावर पसरविली.या प्रकारामुळे पोलीसदलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांना या प्रकाराची दखल घ्यावी लागली. कनोजिया यांना निलंबित करण्याचे आदेश उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले आहेत.
Discussion about this post