Pune News : पुणे : मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद पुणे शहरात झाली असल्याने इंग्रजांच्या काळात ‘नो फॅन सिटी’ म्हणून ओळख असणारे पुणे शहर आता ‘हॉट सिटी’ बनले आहे.
मागील २४ तासात पुणे तळेगाव ढमढेरे येथे ४४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परिसरात बहुतेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्यावर राहिले. यामुळे पंख्याची गरज नसलेले शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहराची अवस्था नागपूरसारखी बिकट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आताच हाती आलेल्या माहितीनुसार अहमदनगर, पुणे, रायगड, सांगली, सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासासाठी हवामानखात्यातर्फे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
Discussion about this post