Pune News : पुणे : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांची तब्येत काल ५ मे रोजी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांचे आज ६ मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ते आज बारामतीतील त्यांच्या गोविंदबागेतील निवासस्थानी विश्रांती घेत असल्याचे वृत्त आहे.
मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार जराही उसंत न घेता प्रचारात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी अनेक ठिकाणी त्यांच्या सभा, रोड शो झाले.सततच्या दौर्यांमुळे त्यांची तब्येत बिघडली.
त्यांचे आज ६ मे रोजी असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांच्यावतीने देण्यात आली आहे.
Discussion about this post