Pune News : पुणे : पुण्यातील सिंहगडरोड पोलिसांनी २७ मार्च रोजी रात्री विशेष नाकाबंदी करून मॉडीइफाईड सायलेन्सर बसविलेल्या बुलेट वेगात चालवून ध्वनी प्रदूषण करत मोटारवाहन कायद्याचा भंग करणार्या ३३ बुलेटचालकांवर कारवाई केली. याबरोबरच फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपलसिट वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे अशी मोटारवाहन कायद्यातील नियमांचा भंग करणारी कृत्ये करणार्यांवरही कारवाई केली.
या प्रकरणी संबंधितांकडून ६३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कामगिरी उपआयुक्त परीमंडळ ३,संभाजी कदम सहायक आयुक्त, भीमराव टिळे, वरीष्ठ निरीक्षक, सिंहगड रोड विजय कुंभार, निरीक्षक (गुन्हे) राघवेंद्रसिंह क्षीरसागर,प्रवीण जाधव, सहायक निरीक्षक निकेतन निंबाळकर, उपनिरीक्षक आत्माराम आहिरे सिंहगड रोड वाहतूक विभाग अंमलदार धनंजय गिरीगोसावी, दयानंद काबळे, मल्हारी सोनकांबळे यांनी केली.
Discussion about this post