Pune News : पुणे : वाघोली पोलीसचौकी समोर स्वतःला जाळून घेण्याच्या प्रयत्नात गंभीररित्या भाजलेल्या तरुणाचा आज १९ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रोहिदास अशोक जाधव (वय ३३,रा.सिद्धी अपार्टमेंट,डोमखेल रोड, वाघोली) असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याने काही दिवसांपूर्वी आपल्याला मारहाण करणार्यांच्या विरोधात वाघोली पोलीसचौकीत तक्रार दिली होती. त्यावर काय कारवाई झाली याची चौकशी करण्यासाठी तो पोलीसचौकीत गेला असता त्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यामुळे त्याने पोलीसचौकी बाहेर स्वतःवर ज्वलनशील द्रव ओतून घेत स्वत:ला जाळून घेतले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीसांना निलंबित केले होते.
९० टक्के भाजलेल्या रोहिदास जाधव वर सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Discussion about this post