व्हीएसआरएस मराठी न्युज –मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दुपारी एक तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज (16 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 1 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आले आहे.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत बोरघाट हद्दीत आडोशी बोगदाजवळ km 40/100 व km 40/900 या ठिकाणी Gantry बसविण्यात येणार आहे. Gantry बसविताना दुपारी तासभर पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालापूर टोल नाका येथे तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. फक्त कारसाठी खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गावरून शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंटवरून द्रुतगती महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात देखील दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु काम वेळेत पूर्ण झाल्याने अर्ध्या तासातच काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
Discussion about this post