व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेद्वारे पिंपरी चिंचवडमध्ये मिनी सब ज्युनिअर गटाच्या राजस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे आयोजन पिंपरी विधान सभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विकास निधीतून पार पडणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यातून खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक व पालक वर्ग मिळून 700 लोक दर दिवशी उपस्थित होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी येथे संध्याकाळी साडे पाच वाजता होणार आहे. या स्पर्धा इंडियन, रिकरव व कामाऊंड या तिन्ही प्रकारात होणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभामध्ये धनुर्विद्या या खेळाचे पहिले मराठी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण हे 10 व 11 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित केले आहे.
Discussion about this post