व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड मध्ये जिल्हास्तरीय जिम्नास्टिक स्पर्धेचे दि. ५,६,७ रोजी आयोजन करण्यात आले आहे आशी माहिती मनोज काळे यांनी दिली.
महाराष्ट्र ॲमेचुर जिम्नास्टिक असोसिएशन यांची ठरल्यानुसार दि.१०,११,१२ ,रोजी डेरवण (चिपळूण) येथे मिनी व सब ज्युनिअर आर्टिस्टिक व एरोबिक्स जिम्नास्टिकची राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याची सर्व सलग्न जिल्हा संघटना युनिटने जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड डिस्ट्रिक्ट जिम्नास्टिक असोसिएशनची मुले व मुली यांची स्पर्धा ठरली असून , मुलींची स्पर्धा एस.पी. एम स्कूल येथे दि.५/११/२०२२ रोजी एलिट जिम्नास्टिक अँड फिटनेस अकॅडमीत होणार असून मुलांची स्पर्धा दि.६/११/२०२२ रोजी ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात होणार आहे ,तसेच एरोबिक्स जिम्नास्टिकची स्पर्धा ७/११/२०२२ हेवन जिम्नास्टिक अकादमी काकाज इंटरनॅशनल स्कूल , रहाटणी येथे होणार आहे .
निवड झालेला संघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधित्व करेल,
या स्पर्धे संदर्भात माहिती एलाईट जिम्नास्टिक अँड फिटनेस अकॅडमीचे अध्यक्ष मनोज काळे यांनी दिली.
Discussion about this post