व्हीएसआरएस मराठी न्युज -सांगली-महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीतील निर्णयानुसार 23 आणि 24 मार्च रोजी सांगली येथे या स्पर्धा पार पडणार असून सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल आहे. या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी दिली आहे.
महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये 10 वजनी गटासह खुल्या गटातील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. यामध्ये 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 असे वजनी गट असणार आहेत. तर महाराष्ट्र केसरी साठी 65 वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. ही स्पर्धा मॅटवर होणार आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगिरास महिला केसरी किताब आणि चांदीची गदा देऊन गौरवण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीमधील निर्णयानुसार 23 आणि 24 मार्च रोजी सांगलीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. पुण्यात आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची ही पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे उपस्थित होते.
महाराष्ट्रात आता पुरुष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा रंगणार आहे.
Discussion about this post