व्हीएसआरएस मराठी न्युज -जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन डीआयसांज इंग्लिश मिडीयम स्कूल, निगडी, येथे करण्यात आले. यामध्ये श्रेया विभांडीक, सिद्धी कुलकर्णीने प्रथम क्रमांक पटकाविला.
डीआयसीज इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या हर्षा जोशी, सारीका कुलकर्णी उपप्राचार्या, पुणे जिल्हा योग संघटना अध्यक्ष मनोज काळे, सचिव रमेश भांडतकर तसेच जयश्री साळवे स्पर्धाप्रमुख व क्रीडा पर्यवेक्षिका विवेक साबळे उपस्थित होते. रविंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात पारंपारीक योगासना स्पर्धे त सिटीप्राइड स्कूलची श्रेया संदीप विभांडीक, अमृता विद्यालयम, निगडीची ईरा बाजीराव धनावडे, एसएनबीपी स्कूल रहाटणीची सई दत्तात्रय जगताप यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. दक्षा धैर्यशील सोधे, आर्या शिवाजी गवारे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात विद्यानंदभवन हायस्कूल निगडीच्या सिद्धी समीर कुलकर्णी, सिटो स्कूलच्या किमया अतुल चोरबेले, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयच्या वैष्णवी महेश मारणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला. निशा जमादार, ऋचा पवार यांनी चांगली कामगिरी केली.
Discussion about this post