व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी (प्रतिनिधी) निगडी येथील चिंचवड मल्याळी समाज संचलित सीएमएस हायस्कूलचा क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.
यावेळी आमदार अण्णा बनसोडे, उद्योजक किरण शिंदे, माजी नगरसेवक संदीप चिंचवडे, सीएमएसचे अध्यक्ष टी. पी. विजयन, सरचिटणीस सुधीर सी. नायर, खजिनदार पी. अजयकुमार, पी. श्रीनिवासन, पी. सी. विजयकुमार, जॉय जोसेफ, पी. व्ही. भास्करन, महिला विभाग प्रमुख प्रविजा विनीत, प्रवीण पणिक्कर, अनिल परमेश्वरन, जी करुणाकरन, के एस विंसेंट,शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.बिजी गोपकुमार, चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेमध्ये सुरू केलेल्या संगीत वर्ग, चिल्ड्रन पार्क, बहुउद्देशीय सभागृह, ग्रंथालयाचे उदघाटन आमदार बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार बनसोडे म्हणाले कि, सीएमएस ने गेल्या ४० वर्षात दर्जेदार शैक्षणिक सेवा दिल्यामुळे आज शहरात एक नावलौकिक मिळवला आहे. सीएमएस संस्था उत्तम शिक्षणासोबतच कला- क्रिडा सारखे उपक्रम राबवत आहे. हि कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी सांस्कृतिक व क्रिडा विभागात यशस्वी विद्यार्थ्यांचा व क्रिडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टी.पी विजयन यांनी तर स्वागत सुधीर सी. नायर यांनी केले
Discussion about this post