व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने, निगडी येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय कॉर्फबॉल स्पर्धेमध्ये आकुर्डीच्या सेंट उर्सूला हायस्कूलने १४ वर्षे, १७ वर्षे आणि १९ वर्षांखालील गटांत तिहेरी मुकूट पटकाविला.
स्पर्धेचे उद्घाटन सेंट उर्सूला शाळेच्या प्राचार्या सिस्टर ग्रेसी यांच्या हस्ते झाले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक सचिन ववले, अविनाश आहिरशिंगे, वर्षा थोरात, प्रतिक्षा पहार, पंच श्रेयश शेवते, अभिषेक नरवडे यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे ः
१४ वर्षांखालील गट – अंतिम सामना ः सेंट उर्सूला हायस्कूल (प्रद्युम्न नायर ३, अन्वीत बोरसे २, युविका कोल्हे २, आकांक्षा खंडागळे २, एशा कुट्टी २, नमन जैन १) १२ गुण वि.वि. सीएमएस स्कूल, निगडी १ गुण (श्लोक वाघ १); १७ वर्षांखालील गट – सेंट उर्सूला हायस्कूल (संस्कृती पाटील २, सई मोहिते २, स्वरुप चव्हाण १, सोहम फडतरे १,कृष्ण सातव १, आर्या पाटील १, रिया बोरा १) ९ गुण वि.वि. पीडीईएम इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी २ गुण (दिवेश पांडे १, कुशल पाटील १);
१९ वर्षांखालील गट – सेंट उर्सूला हायस्कूल (अनुष्का शिंदे २, शर्वरी शिंदे १, स्निग्धा सातव १,ओंकार गावडे १, महिमा जक्कनवार १, आरिझ दानवले १) ७ गुण वि.वि.सीएमएस हायस्कूल १ गुण (सर्वेश मोरे १)
Discussion about this post