व्हीएसआरएस न्युज भारतात आजपासून ( दि. १६) जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची ऑनलाईन सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत भारतातील पहिली कोरोना लस दिल्लीतील एम्स रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्याला देण्यात आली.
मनिष कुमार या एम्स रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्याला आज भारतातील पहिली कोरोना लस देण्यात आली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन उपस्थित होते. यावेळी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
आजपासून भारतात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे.
सर्वात प्रथम कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत आज देशभरातील ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.