व्हीएसआरएस न्युज अहमदाबाद। सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियमवर बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.
हा सामना सुरु होण्याआधी पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरण रिजिजू, आदी मान्यवर देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
मोटेरा स्टेडियम हे पुर्नबांधणी केलेले स्टेडियम असून आता ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते.
अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. मोटेरा स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नावाने ओळखलं जाणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
या उद्घाटन सोहळ्याला अमित शाह यांच्यासह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. अमित शाह यांनी म्हटलं की, आज खेळ जगतासाठी सुवर्ण दिन आहे. आज भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते भारतरत्न सरदार पटेल यांच्या नावे मोठ्या स्पोर्ट्स कॉम्लेक्सचं भूमीपूजन करण्यात आलं आहे.
सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्लेक्समध्ये जगातील सर्व खेळांची व्यवस्था असणार आहे. देशातील आणि जगातील सर्व खेळाडूंच्या ट्रेनिंग आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे. याठिकाणी 3000 मुलांची एकाचवेळी खेळण्याची आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.