Himachal : सिमला : हिमाचलप्रदेश विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभापती कुलदीप पठानिया यांनी भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले असून त्यामध्ये माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचाही समावेश आहे.
या आमदारांनी सभागृहाचे कामकाज सुरू असताना गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचे सांगत सभापतींनी ही निलंबनाची कारवाई केली.तत्पूर्वी त्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली.
प्राप्त माहितीनुसार हिमाचलप्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी सिमल्यात सुरू झाले. कामकाज सुरू असताना गदारोळ झाला.विरोधी आमदारांनी वेलमध्ये जाऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गदारोळ झाला. सभापतींनी सभापतींनी विरोधीपक्ष नेता आणि आमदार जयराम ठाकूर, डॉ. विपिनसिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्रकुमार, विनोदकुमार, डॉ. हंसराज, डॉ. जनकराज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शौरी, दीपराज, पूर्णा ठाकूर, इंदरसिंग गांधी, दिलीपसिंग ठाकूर आणि रणबीरसिंग यांना सभागृहाच्या कामकाजातून निलंबित केले. तसेच मार्शलला हकालपट्टी केलेल्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.
अशी घटना हिमाचलप्रदेश विधानसभेच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.
Discussion about this post