व्हीएसआरएस न्युज राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
विरोधी पक्षासह सरकारमधील काही मंत्र्यांची सुद्धा सुरक्षा कमी केली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकमध्ये कोण कोणत्या नेत्यांची सुरक्षा वाढवायची आणि कपात करायची याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा देण्यात आली आहे. याआधी सुद्धा अजित पवार हे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.