व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज दुपारी एक वाजता एकाने गोळीबार केला ही घटना वान्यासारखी शहरभर पसरली आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत,
या घटनेनंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे या आवाहनात अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे की माझ्या सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना कळवतो की आज जो काही प्रकार घडला आहे त्यामध्ये मला किंवा अन्य कोणालाही काही झालेले नसून मी सुखरूप आहे तरी सर्वांनी संतप्त न होता कोठे गर्दी करू नका व पुढील तपास पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याचा सोक्षमोक्ष ते करतील, कृपया आपण शांतता बाळगा, कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.