व्हीएसआरएस न्युज पिंपरी- चिखली येथे घडलेल्या या घटनेचा तात्काळ पंचनामा करण्यात आला. तसेच, पोलीस अहवाल घेऊन कागदपञे तत्परतेने मागविण्यात आली. मयत व्यक्ती चिखली येथील रहिवासी असल्याने पिंपरी-चिंचवड तहसिलदार गीता गायकवाड यांनी तात्काळ प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या. तसेच, शासन निर्णयाप्रमाणे ४ लाख रुपयांचा धनादेश बाधित कुटूंबियांना मिळवून देण्यासाठी प्राधान्यक्रम दिला.
हा ४ लाख या रक्कमेचा धनादेश मंडळ अधिकारी भोसरी जयश्री कवडे व तलाठी चिखली चडचणकर यांनी निवासस्थानी जाऊन सुपूर्त केला. प्रशासनाने दाखवलेल्या सजगतेमुळे बाधित कुटूंब सदस्यांना काहीसा आधार मिळाल्याचे कुटूंबियांनी बोलून दाखविले आहेत.
राज्याभरासह पुण जिल्ह्यात देखील १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत मारुती टिंबर (रा. चिखली) यांचा मृत्यु झाला होता. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड तहसिलदार कार्यालयाने तत्परता दाखवत मृत्यू झालेल्या मारुती टिंबर यांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत मिळवून दिली.