व्हीएसआरएस न्युज पिंपरी चिंचवड शहर भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार पै. महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दादांनी जे आव्हान केल होत की माझा जन्मदिवस हा कोरोनायोध्याना समर्पित असून तो समाजोपयोगी कार्यक्रम राबवुनच साजरा करावा.
आमदार दादांचे विचार पुढे घेत भाजप युवा मोर्चा युवती सोशल मीडिया संयोजिका पूजाताई आल्हाट यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त आज चिंबळी येथील अनाथ आश्रमास भेट दिली व तेथील 40 मुलींना ड्रेस व खाऊ वाटप केला, तसेच आश्रमास धान्यस्वरूपी मदत करण्यात आली.
आश्रमातील अनाथ मुलींनी स्वागत गीत म्हणून युवा मोर्चाचे स्वागत केले, तसेच प्रार्थना म्हणून कार्यक्रम मंत्रमुग्ध केला. आश्रमातील महिला कर्मचारी भारती ताईंनी आश्रमातील मुलींची दिनचर्या व आश्रमाचा थोडक्यात परिचय दिला.
यश कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा चे अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, चिटणीस प्रकाश चौधरी, युवा नेते निलेश बोराटे, निलेश तळेकर, अलका वाघुले यांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला.