व्हीएसआरएस न्युज
पिंपरी प्रतिनिधी : अवैध बांधकाम शास्त्रीकर मूळ मिळकतीच्या भरणा स्वीकृत करण्याबाबत अखेर राष्ट्रवादीला काँग्रेसला यश आले आहे.
गेल्या काही दिवसापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने जाणीवपूर्वक सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत होते मात्र विरोधी पक्षांनी ही मागणी उचलून धरत अजित दादा पवार यांना साकडे घालून अखेरची सोडवली व उपसचिव यांनी पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र पाठवून तसे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, त्यामुळे पिंपरी-चिंचवड मधील सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांना पत्र देण्यात आले यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ शहराध्यक्ष संजोग वाघेरे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या उपस्थितीत हे पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून मा.आयुक्त, पिं.चिं.मनपा यांना नागरीकांकडून शास्तीकर वगळून मुळ मिळकत कराचा भरणा स्विकृत करण्याच्या प्रस्तावास दि.३१ मार्च २०२१ पर्यंत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाविकास आघाडी सरकारला विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री-अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकांचा शास्तीकर वगळून केवळ मुळ मिळकत कर भरून घेणेबाबत, असे आदेश व्हावेत व नागरीकांना दिलासा द्यावा, म्हणून विनंती केली होती.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरीकांना (विशेषत: रेडझोनमधील) शास्तीकर भरणेबाबत मिळकत जप्तीच्या नोटीसा पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील आर्थिक अडचणीत असलेले सर्व सामान्य नागरीक चिंताग्रस्त आहेत.
म्हणून शास्ती कर वगळून सामान्य कर वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिका आयुक्त यांना आदेश दिले आहेत.