व्हीएसआरएस न्युज -पिपंरी-चिंचवड आकुर्डी सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत मानसी जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी या भागातील 58 मुलांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक नागेश गायचोर याने तर तृतीया क्रमांक अथर्व शिंदे याने मिळविला. विजेत्या स्पर्धकांना फाउंडेशनच्या वतीने ट्रॉफी देण्यात आली.
नवीन पिढीतील मुलांना इतिहास कळावा किल्ल्यांचे महत्त्व समजावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे आयोजन आकुर्डी सोशल फाउंडेशनचे संस्थापक के.के. कांबळे, अध्यक्ष वाहिद पटेल यांनी केले. यावेळी ओबीसी संघर्ष सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला मनसे युवा कार्यकर्ते आशिष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल काळे पाटील, नवनाथ ढेरंगे, सचिन निकम, योगेश गोकुळे अादी कार्यकर्ते उपस्थित होते.