व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 811 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच दिवसभरात 4 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 2 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे.
शहरातील मोशी व वल्लभनगर येथील दोघांचा तर शहराबाहेरील आळंदी व आगरकरवाडी येथील दोघांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरामध्ये 487 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 853 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2839 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1786 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1309 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 5147 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 6456 इतकी आहे.
आज पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी रुग्णालय परिसरात सर्वाधिक 187 रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याखालोखाल जिजामाता, सांगवी, तालेरा रुग्णालय परिसरात प्रत्येकी 100 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच यमुनानगर 85, आकुर्डी 83, थेरगाव 78 व वायसीएम रुग्णालय परिसरात 48 बाधित आढळले आहेत. आज दिवसभरामध्ये 5603 जणांना लस देण्यात आली.