व्हीएसआरएस न्युज पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पोलीस स्टेशन सनीटाईज करणे रिक्षा सनीटाईज करणे, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करणे, मास्क वाटप करणे, असे विविध कार्यक्रम पक्षाच्या वतीने घेण्यात येत आहेत.. रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलीस बांधवांना चहा पाणी नाष्टा ची व्यवस्था आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात येते ..
आज पिंपरी चिंचवड
शहरातील आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील रावेत बोगद्या जवळ जी कोरोना साठी नाकाबंदी चालू आहे तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना आम आदमी पार्टीच्या वतीने चहा आणि नाष्ट्यायचे वाटप करण्यात आले..
या वेळी पत्रकारांशी बोलताना आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अनुप शर्मा यांनी सांगितले संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर व सर्व विधानसभा अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या वतीने कोरोना जनजागृती व मदत कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे , गेली दहा ते पंधरा दिवसापासून नाकाबंदी पोलिसांना चहा नाष्ट्याची व्यवस्था ही आम आदमी पार्टी कडून करण्यात येत आहे.. नाकाबंदी करत असणार्या पोलिसांना शासनाकडून ऊन वारा पावसामुळे बचावकार्य़ासाठी शासनाने नाका-बंदी च्या ठिकाणी व प्रत्येक चौकात केबिन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे अशी मागणी ही मीडियाद्वारे केली
यावेळी पिंपरी चिंचवड शहर महिला विंग अध्यक्ष स्मिता पवार यांनी बोलताना सांगितले की महिलांच्या वतीने अन्नधान्य व तांदूळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आहे , प्लाजमा दान करण्यासाठी महिलांनी खूप सहकार्य केले असे त्यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीचे सदस्य वैजनाथ शिरसाट यांनी बोलताना सांगितले की पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबांसाठी बेड आरक्षित करणे गरजेचे आहे असं ते म्हणाले अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना पूर्ण होऊन काहींचा उपचाराअभावी मृत्यू झाला याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे, महाराष्ट्र सरकारचे दिल्ली सरकारचा आदर्श घ्यावा व तशा योजना महाराष्ट्रात लागू कराव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले..
या वेळी पुणे जिल्हा सामाजिक न्याय विंग चे अध्यक्ष वाहाब शेख, पिंपरी-चिंचवड महिला विंग उपाध्यक्ष माधुरीताई गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले..
तसेच पोलीस कर्मचारी यांनी आम आदमी पार्टी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले
यावेळी आम आदमी पार्टीचे सामाजिक न्याय विंग उपाध्यक्ष विजय अबाड, किशोर जगताप, कुनाल बिरादार , बर्गली गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.