व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
पिंपरी. येथील मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने वर्गणी गोळा करूण दोन ॲाक्सीजन कॅान्सट्रेटर खरेदी केले .
कोविड च्या काळात समाजाची व काळाची गरज पाहून एक छोटासा हातभार लागावा हाच हेतूने हे रूग्णास मोफत ( विना भाडे ) दिले जातील. आजपासून या मशिन्स गरजू व गरीब रूग्णास महाविद्यालयात उपलब्ध असतील . या मशिन्स चं आज औपचारिक उदघाटन करून माहीतीगाराच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली . याप्रसंगी प्रभारी प्राचार्या डॉ विनिता बसंतानी , प्रा. शकूर सय्यद , प्रा. सौ सुनिता डेसले , प्रकल्प समन्वयक मनमोहन मेघराजानी , माजी विद्यार्थी संधटनेचे पदाधीकारी गुरूदेव सांग कैरा , प्रा हेमंत राजेस्थ , शशि थवानी आदी उपस्थित होते .