व्हीएसआरएस न्युज पुणे- करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्चपासून बंद असलेले शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय मंगळवारपासून (दि.15) पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5.50 या वेळेत न्यायालय सुरू राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या व तात्काळ दाव्यांना पुढील तारखा मिळणे थांबणार आहे.
मात्र, पिंपरी, ग्रामीण भागातील न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तेथील न्यायालय पूर्वीप्रमाणे सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत सुरू राहणार आहे.
करोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्यात टप्प्याटप्याने अनलॉक करण्यात येत आहे.
त्यानुसार आता पुणे महानगरपालिका हद्दीत न्यायालयाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या बाबतच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाकडून जिल्हा न्यायालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामकाजाची वेळ कशी असेल याबाबतचे परिपत्रक प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी काढले असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी दिली.
Discussion about this post