व्हीएसआरएस न्युज पिंपरी-दि. २८,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या १३६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत शहर युवक काँग्रेस ने रोजदांरी मजूर सेवा उपक्रमाचे आयोजन केले या वेळी मजूरांना थंडी पासून बचावासाठी शाॅल व कोरोना पासून बचावा साठी मास्क चे वाटप करण्यात आले.
निगडी येथील ओटा स्कीम येथील कामगार नाका चौक व भोसरी पूलाजवळील चौकातील मजूर कट्यावर जाऊन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनीं मजूरांची भेट घेऊन त्यांना वस्तूचें वाटप केले व यावेळी मजूरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सद्य स्थितीतील अडचणी समजवून घेतल्या.
या बाबत उपक्रमाचे आयोजक व युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी माहीती देताना सांगितले, काँग्रेस पक्ष हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना व १३५ वर्षांची त्याग,बलिदान,देशप्रेम व देशाची अंखडता जपण्याची उत्तम परंपरा असलेला मोठा दैदिप्यमान पक्ष आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून ते देश सर्व क्षेत्रात सक्षम व स्वंयपूर्ण करण्यापर्यंतचे संपूर्ण काम करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा व अविस्मरणीय वाटा आहे. काँग्रेस ची सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता व लोकशाही मूल्ये जपणारी जीवनशैली जमसामान्यांमध्ये आजही तेवढीच खोलवर रूजलेली पाहण्यात येते याचे कारण म्हणजे गरीब, शेतकरी, मजूर, कामगार, कष्टकरी, नोकरदार, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सैनिक, उद्योजकता यांना राजकारणाचा केंद्रबिंदू मानून काँग्रेस ने सत्तेतून जनसेवेचे व्रत हाती घेऊन योजना राबविल्या. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडीत नेहरू, मौलाना अबूल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिराजी गांधी, राजीव जी गांधी यांच्या कार्यातून ते शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी व सामान्य माणसांसाठी झटले व त्यांच्या कार्यातूनच प्रेरणा घेऊन व काँग्रेस च्या घोषणा वाक्या प्रमाणे ‘काँग्रेस चा का हात आम आदमी के साथ’ या प्रमाणे आज काँग्रेस स्थापना दिनी या रोजंदारी मजूरांची सेवा उपक्रमाचे आयोजन केले आहे, असे ते म्हणाले.
या प्रसंगी मोहन उघडे,अनिल चौधरी, विजय राजपूत, राजू ढवळे, बाळू गरड, संदीप बनसोडे व सुरेश जाधव आदि व ईतरही अनेक रोजदांरी मजूर सहभागी झाले.
यावेळी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस , विरेंद्र गायकवाड, मिंलिंद बनसोडे, अनिल सोनकांबळे, पिंपरी विधानसभा युवक चे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, अर्णव कामठे, प्रविण जाधव, पांडूरंग वीर
आदी पदाधिकारी उपस्थित होते.