व्हीएसआरएस न्युज भोसरी– कुदळवाडी भागात मनपा नवीन रुग्णालय/दवाखाना सुरू करा – स्विकृत सदस्य दिनेश यादव यांची मागणी
कुदळवाडी परिसराला मनपात सामील होऊन वीस वर्षे होऊन गेली आहेत.पण अजूनही या भागात पायाभूत सुविधा आलेल्या नाहीत आणि त्याचा एक भाग म्हणून या भागात नवीन रुग्णालय,दवाखाना सुरू करण्यासाठी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी पुढाकार घेतला आहे.याबाबत प्रशासनिक पत्रव्यवहार सातत्याने होत आहे ज्यावरून लवकरच दवाखाना,रुग्णालय सुरू व्हायची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
,कुदळवाडी हा भाग अजूनही म्हणावा तसा विकसित झालेला नाही आणि पायाभूत सुविधा विकसित करायला वाव आहे.परिसराच्या विकासाचे व्रत दिनेश यादव यांनी घेतले आहे आणि पालिका प्रशासनाला याबाबत सातत्याने त्यांच्याकडून विचारणा करण्यात येत आहे. कोरोना काळात या भागात रुग्णालय नसल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली आणि नागरिकांच्या समस्येला दिनेश भाऊंनी वाचा फोडत लवकरात लवकर रुग्णालय,दवाखाना सुरू करावा म्हणून आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे.पुढील काही महिन्यात याबाबत सकारात्मक बातमी मिळेल असा आशावाद दिनेश यादव यांनी व्यक्त केला आहे.