व्हीएसआरएस न्युज पिंपरी-कोरोनाग्रस्त रुग्णांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मिळणार मोफत प्लाजमा – भाजपा युवा मोर्चाच्या मागणीला यश
जन माणसांची भावना लक्षात घेत सकारात्मक विचार करून आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिके द्वारा आज मोफत प्लाजमा पुरवठा करण्याचा लोकहिताचा निर्णय घेण्यात आला..
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाची संख्या वाढती आहे. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्या दवाखान वरती ताण आले असताना नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. अशा वेळी प्लाजमा ची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्लाजमा या लढ्याचा प्रमुख शस्त्र मानला जातो तसंच त्याचा वापर करून कोरोना ग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे. परंतु प्लाजमा दात्यांची कमतरता भासू लागली असताना रुग्णांच्या नातेवाईकांचा कल हा महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढी कडे जास्त आहे.
पण मग पहिला लाटेच्या तुलनेत आता राज्य सरकारच्या नियमानुसार प्लाजमा साठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीत सुद्धा सहा हजार रुपये द्यावे लागत आहे. अशावेळी आधीच खाजगी रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या लोकांवरती हा अधिकचा आर्थिक भार पडत होता. याचीच दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चा शहराच्या वतीने भाजपा आमदार महेश दादा लांडगे, महापौर माई ढोरे व स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्याकडे प्लाजमा मोफत करण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली होती.
त्याच मागणीला आज खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले असून आम्ही आमदार पै महेश दादा लांडगे आमदार श्री लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे व स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले.