व्हीएसआरएस न्युज पिंपरी- सुवर्णक्रांती फाऊंडेशन, सुवर्णराज महिला मंडळ आणि सुवर्णराज बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील कोविड सेंटर आणि प्रसूतिगृहातील महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला.
महिलांसाठी राबविलेल्या या स्त्यूत्य उपक्रम राबविला.
सुवर्णक्रांती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, तसेच जननी आहार पुरवठा योजनच्या सुवर्णा राजेश झाडे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सण साजरा होत असताना या महिलांवर रुग्णालयात राहण्याची वेळ आली. त्यांना देखील या सणाचा आनंद घेता यावा, असा या समारंभाचा उद्देश होता.
सोलापूरमधील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रसूतीगृह, बॉयस हॉस्पिटल, दाराशा हॉस्पिटल, चाकोते हॉस्पिटल, डफरीन हॉस्पिटल, साबळे हॉस्पिटल, भावनाऋषी हॉस्पिटल, रामवाडी प्रसुती गृह, वाडीया हॉस्पिटल या रुग्णालयात हा हा हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. रुग्णालयात उपचार घेणा-या महिलांबरोबर तेथील परिचारिका, महिला डॉक्टर आणि कर्मचा-यांनाही सहभागी करून घेण्यात आले.
या उपक्रमात डॉ. सुनीता देगांवकर, मेट्रन उज्वला पाटील, मेट्रन लेकुरवाळे, मेट्रन मोरे, सिस्टर ढगे, सिस्टर जाधव, सिस्टर तोरणे, सिस्टर बर्गे, सिस्टर शेख, सिस्टर गायकवाड सिस्टर कोळेकर, सिस्टर दिलनाज, सिस्टर धोत्रे, सिस्टर सुरवसे यांनीही सहभाग घेतला. तर, सावित्री खेलबुडे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.