व्हीएसआरएस न्युज पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पे अँड पार्क योजना तातडीने बंद करण्यात यावी असे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष अनुप शर्मा यांनी दिले आहे.
आम आदमी पार्टी महिला अध्यक्ष स्मिता पवार युवा अध्यक्ष चेतन बेंद्रे, आप समिती सदस्य वैजनाथ शिरसाट, नंदू नारंग आदी उपस्थित होते या निवेदनात असे म्हटले आहे की
केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिक त्रस्त असताना पिंपरी चिंचवडचे महापौर पालिका सत्ताधारी भाजपकडून शहरवासीयांच्या खिशाला कात्री लागणारी धोरणे राबविली जात आहेत. भ्रष्टाचारी कारभारामुळे करदात्यांच्या करोडो रुपयांचा भाजपच्या नेतृत्वाखाली चुराडा केला आहे तरी देखील शहर वाशियांकडून पैसे काढून आपली तिजोरी भरण्याचा हव्यास भाजप कडुन सुरूच असल्याचे दिसते.
भाजपने शहरात पार्किंग पॉलिसी राबवण्याचा खटाटोप चालू केला आहे. या पार्किंग पॉलिसीची 1 जुलै पासून पिंपरी-चिंचवड महापालिका विभागा मार्फत अंमलबजावणी करण्यात आली आहे , शहरातील रस्त्यांची विभागणी करून ती खाजगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे, हे कंत्राट घेणारी एजन्सी सर्व ठिकाणी एकच आहे. ही खंडणी वसुलीच आहे, याआधीच इंधन दरवाढ महागाईमुळे बेजार झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांकडून आता वाहने उभी करण्यासाठी पैसे घेऊन एक प्रकारची लुटीचा डाव टाकलेला आहे .यासाठी शहरातील वाहतुकीचा शिस्त लावण्याचे कारण पुढे केले जात आहे ,परंतु यामागे सत्ताधारी भाजप चा खरा हेतू हा पिंपरी-चिंचवडकरांचा लूट करण्याचा आहे.
सध्या स्थितीत कोरोनाचे भीषण संकट उभे ठाकलेले आहे. नागरिकांन पुढे रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. कोरोणामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे व्यवसाय उद्योग धंदे अडचणीत आले आहेत, लाखो नागरिकांचे रोजगार गेले आहे, त्या परिस्थितीत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून वाहने उभी करण्यासाठी पैसे काढणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने पे अँड पार्क ही योजना बंद करावी अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने मोठे आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा ही आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला.
Discussion about this post