व्हीएसआरएस न्युज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सतेज पाटील यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
‘माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन’, असे ट्वीट सतेज पाटील यांनी केले आहे.
याआधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती.
‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल’, असे ट्वीट त्यांनी केले होते.