व्हीएसआरएस न्युज विश्व श्रीराम सेना अध्यक्ष श्री लालबाबु यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर तलाव आणि नदी काठी छठपूजे साठी राज्य सरकारला मागणी केली आहे.
छठपूजेच्या निमित्ताने भाविक मोठय़ा संख्येने तलाव, नदी किंवा पाण्याच्या स्रोताजवळ एकत्र येतात. जल आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करून स्नान करतात आणि तिथेच पूजा करतात. मोशी टोलनाका छठघाट ची साफ सफाई व इतर सुविधा स्थानिक प्रशासन व राज्य सरकारला मागणी केली आहे. सध्या सर्व धार्मिक स्थळ अनलाॕक झाली आहे. छठपूजेला भाविक जल स्रोताजवळ स्नान करतात, मुळे नदी काळी स्वच्छता व इतर सुविधा द्यावी अशी मागणी लालबाबु गुप्ता यांनी केली आहे.
दिवाळीनंतर लगेचच २० व २१ नोव्हेंबरला येणाऱ्या छटपूजा कार्यक्रमासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून नियम व अटींच्या अधीन राहून छटपूजेसाठी परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी विश्व श्रीराम सेना अध्यक्ष लालबाबु गुप्ता यांनी केली आहे. पालिका- महापालिका पत्राद्वारे सदर मागणी करण्यात आली.
पुणे पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय नागरिक वास्तव्य करतात. उत्तर भारतात दिवाळीनंतर लगेचच छटपूजा या धार्मिक विधीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. गेली कित्येक वर्षे पिंपरी-चिंचवड शहरातसुद्धा छटपूजेचे आयोजन विविध ठिकाणी केले जात आहे. दरवर्षी या कार्यक्रमास महानगरपालिका आवश्यक परवानगी देत असते.
मात्र या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. साधारणत: आजमितीस १०० लोकांपर्यंत कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे.
छटपूजेसाठी छोटासा कृत्रिम तलाव / हौद महापालिकेच्या अखत्यारीतील जागेवर उभारून त्यावर एका वेळी १००पेक्षा कमी लोकांना कोविड खबरदारीचे सर्व नियम पाळून, मास्क लावून, सामाजिक अंतराचे ध्यान ठेवून छटपूजा करण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत व तत्संबंधीचे आदेश विभागीय सहायक आयुक्तांना द्यावेत, अशी मागणी विश्व श्रीराम सेनाचे वतीने करण्यात आली.