व्हीएसआरएस न्युज पिंपरी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधनपर्वाचे 18 व 19 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजन.
महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि यु ट्युब चॅनेलवरुन या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाणार आहे. नागरिकांनी हे कार्यक्रम घरबसल्या आवर्जुन पहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (दि.18) दुपारी 4 वाजता महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे,
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणा या या कार्यक्रमावेळी खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, संग्राम थोपटे, उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
www.facebook.com/pcmcindia.gov.in या फेसबुक लिंक वर तसेच pcmcindia युट्युब चॅनेलवर कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.