व्हीएसआरएस न्युज चिंचवड -चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा चिंचवड किवळे मंडलाच्या वतीने आयोजित ‘जिल्हा स्तरिय बुद्धिबळ आमदार चषक’ या स्पर्धेचे चिंचवडगावातील मोरया मंगल कार्यालय येथे करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, ब’प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, चिंचवड किवळे मंडलाध्यक्ष व मुख्य संयोजक योगेश चिंचवडे, ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, शहर भाजप उपाध्यक्ष काळूराम बारणे, नंदू भोगले, सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, चिंचवड किवळे मंडलाच्या महीला मोर्चा अध्यक्षा पल्लवी वाल्हेकर, बांधकाम व्यावसायीक संतोष निंबाळकर, कामगार नेते हरीभाऊ चिंचवडे, ओबीसी आघाडीचे मंडलाध्यक्ष प्रशांत आगज्ञान, उद्योजक किरण गडसिंग, दिपक गावडे व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले.
आ.लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी चिंचवड किवळे मंडलाध्यक्ष योगेशजी चिंचवडे, नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, बुद्धिबळ स्पर्धा संचालक नगनाथ हालकुडे, सह-संचालक विवेक भागवत, सह-संचालक उमेश खेंगरे, ओबीसी आघाडीचे मंडलाध्यक्ष प्रशांत आगज्ञान, मनिषाताई चिंचवडे, पल्लवी वाल्हेकर, सनी बारणे, रविंद्र प्रभुणे, प्रदिप पटेल, तेजस खेडकर, यश बरडीया, गोरक्ष शेलोत यांनी परिश्रम घेतले आहेत.