व्हीएसआरएस न्युज पिंपरी- एकादशीचे शुभदिनी या सोहळ्याची सुरुवात संत पूजन, विना पूजन नरहरी महाराज चौधरी यांचे हस्ते तसेच तुकाराम महाराज गाथा व श्री ज्ञानेश्वरी पूजन पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते झाले.
पुणे आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ति प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिना निमित्त अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत तपपूर्ती सोहळ्यात ८ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत हरिनाम सप्ताह होत आहे. या अंतर्गत सप्ताहास विविध धार्मिक कार्यक्रमानी हरिनाम गजरात सुरुवात झाली.
कलश पूजनाने मारुती महाराज कुरेकर यांचे हस्ते झाले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे अध्यक्ष अड विष्णू तापकीर , खजिनदार दत्तात्रय गायकवाड, ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर, बाळासाहेब महाराज चोपदार, ज्ञानेश्वर गुळूंजकर, मृदंगाचार्य फड महाराज आदि उपस्थित होते.
सप्ताहात महापूजा, काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महिला भजनी मंडळाची भजने ,हरिपाठ, हरिकीर्तन व हरी जागर असे कार्यक्रम होत आहेत. संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत प्रसाद महाराज माटे , सतीश महाराज काळजे, ज्ञानेश्वर महाराज कदम गुरुजी, संतोष महाराज काळोखे, विश्वनाथ महाराज मस्के, संजय महाराज कावळे, विष्णु महाराज केंद्रे, अशोक महाराज साखरे, चंद्रकांत महाराज वांजळे यांनी कीर्तन सेवा होईल. डॉ. रविदास महाराज शिरसाट यांच्या काल्याचे कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अड विष्णू तापकीर यांनी सांगितले.