व्हीएसआरएस न्युज-पिंपरी चिंचवड दि.२५
महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
वल्लभनगर व कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुतीराव गायकवाड, डॉ. अनिकेत लाठी, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
मनपा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.