व्हीएसआरएस न्युज –
देहूरोड बाजारपेठेत दहशत माजवून दरोडा टाकून कपडे चोरणाऱ्या टोळीस अटक, गुन्हे शाखा युनिट ५ ची कारवाई.
दिनांक १/१०/२०२० रोजी रात्री ८-३० वा देहूरोड मार्केट मधील त्रिलोक भावनदास हरवंदानी यांच्या प्रदिप ड्रेसेस नावाचे कपड्याचे दुकान मध्ये काही इसम जाऊन त्यांनी जीन्स आणि शर्ट दाखवण्यास सांगून धाक दाखवून शिवीगाळ करून दुकानात दर्शनी भागात ठेवलेली कपडयाचे ढिगातुन शर्ट व पॅन्ट पिशवीमध्ये भरून जबरीने १०,०००/- रू चे कपडे चोरून नेले होते, तसेच देहूरोड मार्केट मधील अमित कांबळे यांच्या ट्रेण्ड सेंटर या दुकानात खरेदीच्या बहाण्याने घुसून भीती घालून, शिवीगाळ करून १५,०००/- रू चे शर्ट पँट कपडे जबरीने चोरी केले होते यावरून देहूरोड पोलीस स्टेशन येथे दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण सावंत यांनी आरोपी शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केले होते. पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या बातमीने सपोनि राम गोमारे, पोलीस अंमलदार धनराज किरनाळे, ज्ञानेश्वर गाडेकर, गणेश मालुसरे व संदीप ठाकरे यांच्या पथकाने
सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे
1)ऋषीकेश उर्फ शेरया राजू अडागळे, वय-20 वर्षे, रा.उसे गाव, मावळ
2) विजय उर्फ मुया राजु पिल्ले वय-22वर्षे, रा. आंबेडकर नगर, देहुरोड
3) अलबर्ट सायमन जोसेफ वय 20वर्षे, रा. एम. बी. कॅम्प देहरोड
४) अतिष उर्फ गोड्या अनिल शिंदे वय-19वर्षे, रा. श्रीनगर, टेहुरोड
५) राहुल संजय टाक, वय-20वर्षे, रा. एम बी कॅम्प, देहरोड
यांचा पाठलाग करून अतिशय शिताफीने ओटा स्कीम निगडी येथून ताब्यात घेऊन त्यांना गुन्हयांचे पुढील तपासकामी देहुरोड पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा.श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा.श्री सुधिर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ मा श्री. आनंद भोईटे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे मा.श्री राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे, पोलीस अंमलदार धनराज किरनाळे, ज्ञानेश्वर गाडेकर, गणेश मालुसरे, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, राजेंद्र साळुंके, सावन राठोड, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर व गोपाळ ब्रम्हांदे यांनी केली आहे.