व्हीएसआरएस न्युज -दिवाळीनंतर आणि हिवाळा लक्षात घेता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तलाव, नदी किनारी सार्वजनिकरित्या छठ पूजा साजरी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनुमती नाकारली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी काढलेल्या परिपत्रकात सामूहिक छठ पूजा करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने छठ पूजेचे आयोजन केले जाते.
पूजेच्या वेळी कोरोनाच्या नियमांचे पालन होणार नाही, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत, याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. भाविकांनी छठ पूजा घरगुती पद्धतीने साजरी करावी खासगी जागेत, घरात पूजा करतांना सुरक्षित अंतराचे पालन करून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. त्या अनुशंंघाणे आज दि.20 व 21 रोजी प्रभाग क्र 14 चे नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या प्रयत्न ने कै मल्हारराव क्रिडांगण (खाजगी जागेत) दत्तवाडी येते सोशल डिस्टेडीग, मास्क व सेनिटाझर शासनाच्या नियम पूजा करतांना सुरक्षित अंतराचे पालन करून नागरिकांनी काळजी घेऊन आयोजीत केली आहे असे नगरसेवक यांनी सांगितले आहे.
दरम्यान छठ पूजेच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. लोखंडा आणि खरनाच्या वेळेस अन्न, पाणी ग्रहण न करता निर्जळी दिवसभर उपवास केला जातो. संध्याकाळी भात आणि गूळाची खीर बनवली जाते. या व्रतामध्ये साखर, मीठ व्यर्ज असते. लोहंडा आणि खरना नंतर 36 तास निर्जळी व्रत असते.
या व्रताचे नियमही कठीण असतात. छ्ठ मैय्या आणि सूर्य देवताच्या उपासनेनंतर त्यांची कृपादृष्टी कायम रहावी याकरिता छठपूजेचे वर्त केले जाते. या व्रतामुळे आरोग्य उत्तम राहते. घरात धनधान्य, सुख समृद्धी वाढते. तसेच व्रतकरींच्या सार्या इच्छा पूर्ण होतात. अशी देखील धारणा आहे.