व्हीएसआरएस न्युज -कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच शिक्षण पूर्ण करूनही नोकरी न मिळणाऱ्या युवकांची संख्या जास्त आहे. अशा च बेरोजगार युवकांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी महोत्सवासारखे कार्यक्रम आवश्यक आहेत.
हीच परिस्थिती ओळखून नगरसेवक वसंत बोराटे यांनी हा स्तुत्य उपक्रम घेतला. असे उपक्रम मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहते, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश दादा लांडगे यांनी व्यक्त केले. आयोजित नोकरी महोत्सवामध्ये चाळीसहून अधिककंपन्या सहभागी झाल्या होत्या. नोंदणी केलेल्या सात हजार युवकांमधून दोन हजार युवकांना नोकरी मिळाली आहे.
मोशीतील मंत्रा मुमेंटो सोसायटीसमोरील कार्यालयात या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक नितिन अप्पा काळजे, नगरसेविका आश्विनी जाधव, नगरसेविका सारिका बो-हाडे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, माजी जेष्ठ नगरसेवक बबन बोराटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नितीन सस्ते, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष, दिनेश यादव, रवी जांभूळकर, सुरेश म्हेत्रे यांच्यासह मोशीतील अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.