व्हीएसआरएस न्युज मोशी-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक वसंत बोराटे यांच्या माध्यमातून 10 जानेवारी रोजी मोशी येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजप शहर अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून या भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
इच्छुक युवक-युवती यांनी या भव्य नोकरी महोत्सव मध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने करण्यात आले आहे सहभागी होण्यासाठी http://bit.ly/3hl9pta या लिंक वर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे सदर नोकरी महोत्सवाचे ठिकाण मोशी नगर मंत्रा मुमेंट सोसायटी जवळ, चिखली – मोशी रोड, तालुका हवेली जिल्हा पुणे याठिकाणी या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी इच्छुक युवक-युवतींनी मोठया प्रमाणात नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.